उपवर वधुवर सूचक केंद्राच्या मूळ सुविधा १००% फ्री आहेत. फ्री रजिस्ट्रेशन करून तुम्ही -
- तुमचे कायमस्वरूपी अकाऊंट फ्री बनवू शकता. हे कधीही डिलीट किंवा डिॲक्टिवेट केले जात नाही. तुमचे लग्न झाल्यास हे तुमचे तुम्ही करायचे आहे.
- तुमची माहिती तुम्ही कितीही वेळेस अपडेट करू शकता, फोटो बदलू शकता, माहिती बदलू शकता. १००% विनामूल्य.
- तुमची माहिती गोपनीय असते. ती कुठल्याही ॲड एजंसीसोबत कधी शेअर केली जात नाही. रजिस्टर्ड मेंबर तुमची माहिती पाहू शकतात.
- तुम्ही रजिस्टर्ड मेंबर्सचे प्रोफाईल निरनिराळ्या प्रकारे शोधू शकता. ते बुकमार्क करून ठेवू शकता. कितीही प्रोफाईल बुकमार्क करता येतात व नंतर निवांत पाहता येतात.
- तुम्हाला आवडलेल्या स्थळाचा डायरेक्ट मेसेज करता येतो. मुख्यत्वे मुलींच्या प्रोफाईल्सची गोपनीयता राखण्यासाठी आपण कुणाचेही मोबाईल आणि इमेल कधी डिस्क्लोज करत नाही. शेअर करत नाही. त्यामुळे तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला प्रतिसाद द्यायचा की नाही हे समोरील व्यक्तीने ठरवायचे आहे. ही गोपनीयता कठोरपणे पाळली जाते.
- तुम्हाला एखाद्या स्थळाचा मोबाईल नंबर अथवा पत्ता हवा असल्यास तुम्ही ॲडमिनला व्हाट्सॅपवर विनंती करू शकता. अत्यंत माफक चार्जेस घेऊन व तुमच्या व्हेरिफिकेशन नंतर ॲडमिन ती माहिती तुम्हाला उपलब्ध करू शकतात. ह्या मधे ॲडमिनचा निर्णय अंतीम असतो.
"प्रिमीअम" ही विशेष सर्विस आहे. वर्षाचे केवळ १०००/- भरून तुम्ही प्रिमीअम मेंबरशीप घेऊ शकता. ही एक वर्षासाठी मर्यादीत असणार आहे. ही घेतल्यावर तुम्हाला सर्व प्रोफाईल्सचे संपर्क क्रमांक थेट पाहता येतात. ही सर्विस वैकल्पिक आहे. ही न घेता देखील तुमच्या प्रोफाईल वर कुठलीही मर्यादा नाही. फक्त तुम्हाला संपर्काची व स्थळाच्या परीवाराची विशेष माहिती दिसत नाही इतकेच.